Last Updated: Friday, January 11, 2013, 13:57
www.24taas.com, मुंबईमहाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेकडून मुंबईतल्या आझाद मैदानात मोर्चा काढण्यात आला आहे. मुंबई सेंट्रलपासून मोर्चाला सुरुवात झाली होती. अविनाश अभ्यंकरांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चामुळं मुंबई सेंट्रल बस डेपो बंद करण्यात आला आहे. मुंबई सेंट्रलमधील एसटी वाहतूक परळ एसटी डेपोकडे वळवण्यात आली आहे. तर मोर्चामुळं काही ठिकाणी वाहतूक कोंडीही झाली होती. एसटीच्या मनसेप्रणित संघटनेच्या मोर्चामुळं राज्यातल्या परिवहन सेवेवर परिणाम झालाय. यात हजारो कर्मचारी सहभागी झालेत. आंदोलनामुळं एसटीच्या अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
ग्रामीण भागातल्या एसटी आगारांत याचा विशेष परिणाम जाणवतोय. शहरी भागात याचा परिणाम जाणवणार नाही. उपलब्ध कर्मचाऱ्यांकडून ओव्हरटाईम करवून घेऊन एसटी सेवा सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न राहणार आहे
First Published: Friday, January 11, 2013, 13:39