Last Updated: Wednesday, January 16, 2013, 16:44
www.24taas.com, मुंबईपोलीस अधिकारी वसंत ढोबळे यांना मुंबई महापालिकेत प्रतिनियुक्तीवर आणा अशी मागणी, मनसेनं केली आहे. यासंबंधात मनसे नगरसेवकांनी महापौरांना पत्र दिलं आहे.
मनसे नगरसेवक संदीप देशपांडे यांनी हे पत्र दिलं आहे. संदीप देशपांडे यांनी तसे पत्रच पाठविले आहे. महापौरांना त्यासाठी मनसेने पत्र पाठविलेले आहे. नगरसेवक संदीप देशपांडेंनी एसीपी वसंत ढोबळे यांना पुन्हा मुंबईत रूजू करावे यासंबंधी पत्र पाठविले आहे. तशी महापौरांकडे मागणी करण्यात आली आहे. ढोबळेंसाठी मनसेने बॅटिंग सुरू केल्याचे दिसत आहे.
काल राज ठाकरे यांनी फेरीवाल्यांबाबत वक्तव्य केल्यानंतर त्यांनी ढोबळेंच्याही बदलीचा मुद्दा पुढे करून परप्रांतीय फेरीवाल्यांवर हल्ला बोल केला. ते म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून पोलिसांचे मनोधैर्य खच्चीकरणाचे प्रकार सुरू आहे.
First Published: Wednesday, January 16, 2013, 16:37