नागपुरात राज ठाकरेंचे जल्लोषात स्वागत, raj thackeray arrival in nagpur

नागपुरात राज ठाकरेंचे जल्लोषात स्वागत

नागपुरात राज ठाकरेंचे जल्लोषात स्वागत

www.24taas.com, मुंबई
मनसे अध्यक्ष राज ठाकरे २ दिवसाच्या विदर्भ दौऱ्यावर आज नागपूरला पोचले आहेत. आपल्या या दौऱ्या दरम्यान राज ठाकरे नागपूरसह भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या बैठकी घेणार आहेत.

राज मागील महिन्यात विदर्भच्या दौऱ्यावर आले होते. पण प्रकृती अस्वस्थ असल्याने ते या तीन जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची बैठक घेऊ शकले नाहीत. आपण पुढच्या महिन्यात या करता परत येणार असे त्यांनी तेव्हाच जाहीर केले होते.

गेल्या महिन्यात ठरवल्याप्रमाणे राज आज दुपारी विमानाने नागपूरला पोहचले, तेव्हा त्यांचे विमानतळावर ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले.

First Published: Monday, April 15, 2013, 14:24


comments powered by Disqus