Last Updated: Sunday, March 24, 2013, 08:47
www.24taas.com,मुंबईमनसे अध्यक्ष राज ठाकरेंची तोफ अमरावतीत आज धडाडणार आहे. राज ठाकरे कोणाचा समाचार घेणार याकडं सा-याचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, सभेआधी काल अमरावतीच्या इंडियाबुल्सला पाणी देण्यास राज ठाकरे यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. अमरावतीतल्या इंडियाबुल्सच्या वीज प्रकल्पाला शेतीचं पाणी देण्यास ठाकरे यांनी विरोध केलाय. सिंचनाचं पाणी कोणत्याही परिस्थितीत उद्योगांना वापरलं जाऊ नये, अशी भूमिका त्यांनी घेतलीये.
राज यांची आज सायन्स स्कोर मैदानात जाहीर सभा होतेय. त्यासाठी शुक्रवारी रात्री ते अमरावतीत दाखल झालेत. या आधीच्या सभेत अजित पवारांवर टीकेची झोड उठवणारे राज आपल्या या जाहीर सभेत ते कोणाचा समाचार घेणार याकडं सा-याचं लक्ष लागलंय.
First Published: Sunday, March 24, 2013, 08:47