Last Updated: Tuesday, February 12, 2013, 15:05
www.24taas.com, कोल्हापूरकोल्हापुरात आज संध्याकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी महालक्ष्मीचं दर्शन घेतले आहे. राज ठाकरे यांची कोल्हापुरात आज जाहीर सभा आहे. त्याआधी राज ठाकरे यांनी कोल्हापुरच्या महालक्ष्मीचे सपत्नीक दर्शन घेतलें. राज ठाकरे यांचा दीर्घ असा महाराष्ट्र दौरा असणार आहे. त्यांच्या या दौऱ्याकडे साऱ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे.
महाराष्ट्रात मनसेची ताकद वाढविण्यासाठी राज ठाकरे यांनी हा दौरा काढला आहे. राज ठाकरे यांच्या दौऱ्यात अनेक विषयावर बोलणं अपेक्षित आहे. राज यांच्या रडारवर आज नक्की कोण-कोण असणार, राज ठाकरे कोणाला टार्गेट करणार. महाराष्ट्रातील राजकारणात त्याचे काय पडसाद उमटणार? राज ठाकरे ठाकरी शैलीत कोणाचा समाचार घेणार याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
कोल्हापुरात आज राज ठाकरेंची सभा असल्याने मनसैनिकांमध्ये चांगलाच उत्साह संचारला आहे. राज ठाकरेंची तोफ आज धडाडणार असल्याने कोल्हापूरच्या सभेत राज काय बोलणार? शिवसेनेला टाळी देणार की टोला ? याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
First Published: Tuesday, February 12, 2013, 14:13