राज ठाकरेंनी नागपुरात केले पाय मोकळे, raj thackeray in Nagpur

राज ठाकरेंनी नागपुरात केले पाय मोकळे

राज ठाकरेंनी नागपुरात केले पाय मोकळे
www.24taas.com,नागपूर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी सांयकाळी थोडासा निवांत वेळ काढला आणि त्यांनी नागपुरात पायी चालणं पसंत केली.

राज सध्या नागपुरात आहेत. काल दिवसभर नागपूरचा दौरा केला. दौऱ्यानंतर राज ठाकरे हे नागपूर मुक्कमी असून ते रविभवनमध्ये विश्रांती घेत आहेत. दरम्यान, काल रात्री त्यांनी चालणे पसंत केले. ते पाय मोकळे करण्यासाठी सिव्हिल लाइन्समधील रस्त्याने निघाले. त्यांच्यासोबत तीन - चार कार्यकर्ते आणि सुरक्षारक्षक होते.

नागपुरात सायंकाळच्या वेळेत राज फिरायला बाहेर पडल्याने नागरिकांची पंचायत झाल्याचे दिसून आले. एका नागरिकांना राज यांना अडविले आणि थेट प्रश्न केला. तुमच्यामुळे आमच्या फिरण्यात अडथळे येत आहेत, असा त्याचा सवाल होता. तुमच्या फिरण्यावर बंदी नाही. तुम्हीही फिरा मलाही फिरू द्या, असे सांगून राज यांनी त्या नागरिकाला समजावले. त्यानंतर राज पुढे निघून गेले.

First Published: Monday, March 18, 2013, 12:31


comments powered by Disqus