राज ठाकरे यांची आज जळगावमध्ये सभा

राज ठाकरे यांची आज जळगावमध्ये सभा

राज ठाकरे यांची आज जळगावमध्ये सभा
www.24taas.com, जळगाव

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज जळगावमध्ये जाहीर सभा होत आहे. राज ठाकरेंच्या महाराष्ट्र दौऱ्यातली ही शेवटची सभा आहे. त्याच अजितदादा पवार यांनी दुष्काळाबाबत थट्टा केल्याने राज काय बोलणार याकडे लक्ष लागलेय.

राज ठाकरे यांचे काल शनिवारी जळगावात आगमन झालं. दुष्काळी परिस्थितीत दौऱ्याबाबत राज म्हणाले, आधी आयपीएल बंद करा. आम्ही कोणताही चारा घोटाळा किंवा महामंडळाचा पैसा खाल्ला नाही. माझा दौरा पूर्व नियोजित दौरा होता.


जळगावातल्या सागर पार्कवर होणा-या राज यांच्या सभेकडे सा-याचं लक्ष लागलंय..कारण भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते एकनाथ खडसेंच्या जिल्ह्यातच ही सभा होतेय. त्यामुळं खडसे आणि इतर कुणाकुणाचा राज समाचार घेणार याकडं सा-याचं लक्ष लागलंय.

राज ठाकरेंची जळगावात जाहीर सभेची मनसेकडून जय्यत तयारी सुरू आहे. खडसे-जैन-देवकरांचा घेणार का समाचार याकडं लक्ष लागलं आहे. जालन्यात पवारांना विचारलेल्या प्रश्नांची पुन्हा उत्तरं मागणार का, याचीही उत्सुकता आहे.

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या टीकेला राज ठाकरे आजच्या सभेत उत्तर देण्याची शक्यता आहे. १० फेब्रुवारी रोजी सुरु झालेल्या राज यांच्या राज्यव्यापी दौऱ्याची आज जळगावात सांगता होत आहे.

First Published: Sunday, April 7, 2013, 13:13


comments powered by Disqus