Last Updated: Friday, February 15, 2013, 21:43
www.24taas.com, खेड`नक्कल करायलाही अक्कल लागते`, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अजित पवारांवर टीकास्त्र सोडलं. राज ठाकरेंनी आपल्य़ा दौऱ्य़ातली दुसरी सभा आज रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये घेतली. अजित पवार दिवस रात्र पैसे मोजण्यात मग्न असल्याची टीका त्यांनी केली. मात्र नारायण राणेंवर त्यांनी अनपेक्षितपणे हल्लाबोल केला. राणेंची कोकणात राजकीय दहशत असून ते कोकणातल्या जमिनी बळकावत असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला.
त्यांच्या या सभेत शिवसेनेचे सिंधुदुर्गातील माजी आमदार परशुराम उपरकर यांनी मनसेत प्रवेश केला. या सभेत राज ठाकरेंनी अजित पवारांच्या टीकेला अपेक्षेप्रमाणे जोरदार उत्तर दिलं. तर परप्रांतीय कोकणात घुसून कोकणी माणसांच्या जमिनींवर कब्जा करत असल्याचं त्यांनी सांगितलं.
कोकणी माणसानं आपल्या जमिनी परप्रांतीयांच्या घशात घालू नये असंही त्यांनी बजावलं. जैतापूरबाबत आपली भूमिका कायम ठेवत प्रकल्पाला त्यांनी समर्थन दिलं. खेडमध्ये सभा घेऊनही त्यांनी भास्कर जाधव आणि शिवसेनेवर टीका करण्याचं मात्र टाळलं.
First Published: Friday, February 15, 2013, 21:14