Last Updated: Thursday, February 28, 2013, 17:13
www.24taas.com, औरंगाबादराज्यात मनसे-राष्ट्रवादीमधला संघर्ष शिगेला पोहोचला होता. ठिकठिकाणी त्याचे पडसाद उमटले. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन केलं आहे.
बारावीच्या परीक्षा सुरू आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये, याची काळजी घ्यावी आणि सर्व मनसे कार्यकर्त्यांनी शांत रहावं, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे. दुष्काळ, शिवाय १०वी, १२वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा, सार्वजनिक मालमत्तेचं होणारं नुकसान, हे पाहता मनसेच्या सर्व कार्यकर्त्यांना राज ठाकरे यांच्यावतीने आवाहन करण्यात आलं आहे.
सामान्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही यांची काळजी कार्यकर्त्यांनी घ्यावी. असे राज ठाकरेंच्या वतीने आमदार बाळा नांदगावकर यांनी `झी २४ तास`शी संवाद साधताना स्पष्ट केलं. त्यामुळे सध्यातरी मनसे आणि राष्ट्रवादी यांच्यातील राडा थंड झाला आहे.
First Published: Thursday, February 28, 2013, 16:37