राज ठाकरे मनसे विसर्जित करुन शिवसेनेत या- आठवले, Raj Thackeray please came in shivsena say`s Athawale

राज ठाकरे मनसे विसर्जित करुन शिवसेनेत या- आठवले

राज ठाकरे मनसे विसर्जित करुन शिवसेनेत या- आठवले
www.24taas.com, मुंबई

राज ठाकरे यांनी मनसे विसर्जित करुन शिवसेनेत यावे, ते शिवसेनेत आल्यास त्यांचे महायुतीत स्वागत असेल, अशी नवी भूमिका रामदास ठवले यांनी मांडली आहे. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र यावेत, ही शिवसेनाप्रमुखांचीही उच्छा होती, राज शिवसेनेत आल्यास एकत्रितपणे दोन्ही भावडांनी शिवसेना वाढवावी, असंही त्यांनी म्हटलं आहे.

राज शिवसेनेत आल्यास जागावाटपात अडचण होणार नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे. कालपर्यंत मनसेला महायुतीत सहभागी करुन घेण्यास आठवले यांचा विरोध होता. `राज ठाकरे महायुतीसोबत आणि काँग्रेस आघा़डीसोबत नसल्यामुळे असा एक मतदार वर्ग आहे जो, तो मतदार दोघांनाही कव्हर करत नाही. अशा पद्धतीची मतं राज यांना मिळालेली आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांची मनसे आमच्यासोबत आल्याने आम्हाला तेवढी मतं मिळतील असे वाटत नाही.

`असा जर काही प्रयोग झालाच तर, म्हणजे राज ठाकरे यांनी महायुतीत येण्याचा प्रस्ताव मांडला तर, त्याविषयी आरपीआयला गंभीर होऊन विचार करावा लागेल, आणि मला माझ्या कार्यकर्त्यांशी बोलून काय ते ठरवावं लागेल. असं म्हणत रामदास आठवले यांनी राज ठाकरेंना विरोध दर्शवला आहे. त्यामुळे राज-उद्धव एकत्र येण्याबाबत आरपीआयने मात्र वेगळीच भुमिका घेतली होती.`

आरपीयचे नेते रामदास आठवले यांना राज-उद्धव यांनी राजकीय दृष्ट्या एकत्र येऊ नये असे वाटते आणि त्यामुळेच त्यांना ही युती नामंजूर असून त्यांनी राज ठाकरेंना महायुतीत घेण्यास विरोध दर्शवला होता.

First Published: Friday, February 1, 2013, 18:19


comments powered by Disqus