राज ठाकरेंचा झंझावाती दौरा उत्तर महाराष्ट्रात, Raj Thackeray tour in north Maharashtra

राज ठाकरेंचा झंझावाती दौरा उत्तर महाराष्ट्रात

राज ठाकरेंचा झंझावाती दौरा उत्तर महाराष्ट्रात
www.24taas.com, नाशिक

मराठवाडा-विदर्भानंतर आजपासून राज ठाकरेंचा झंझावाती दौरा उत्तर महाराष्ट्रात सुरू होतो आहे. आज राज ठाकरे नाशिकमध्ये येत असून चार दिवस खान्देशचा दौराही ते करणार आहेत.

या दौऱ्या दरम्यान ते कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील. नाशिकमध्ये असलेले पक्षाचे वर्चस्व धुळे, जळगाव आणि नंदुरबार परिसरात वाढवण्याचा प्रयत्न राज ठाकरेंचा असणार आहे. आज दुपारपर्यंत राज ठाकरे नाशिकमध्ये दाखल होतील.

राज ठाकरेंच्या महाराष्ट्र दौऱ्यात त्यांनी त्यांच्या प्रत्येक सभेत स्थानिक नेत्यांना टार्गेट केले होते. त्यामुळे आता नाशिकमध्ये राज ठाकरे कोणाला टार्गेट करणार याकडेच सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

First Published: Tuesday, April 2, 2013, 09:34


comments powered by Disqus