Last Updated: Thursday, April 25, 2013, 17:04
www.24taas.com, झी मिडीया,मुंबई महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील दुष्काळाबाबत राज्य सरकारला जबाबदार धरले आहे. हा दुष्काळ मानव निर्मित असल्याची शंका उपस्थित केली आहे. आता राज स्वत: दुष्काळातील चारा छावण्यांची पाहणी करणार आहे. त्यासाठी ते खास दौरा करणार आहेत.
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी मनसेने धाव घेतली आहे. जनावरांसाठी खास चारा छावण्या सुरू केल्या आहेत. दुष्काळी भागात चारा छावण्या आणि पाण्याची सोय करण्याबाबतचा एक कार्यक्रम पक्षातर्फे तयार करण्यात आला होता. या कार्यक्रमाची काय प्रगती आहे हे पाहण्यासाठी हा दौरा असल्याचं मनसेच्या वतीनं सांगण्यात आलंय.
फोटोफीचर राज ठाकरे 
राज ठाकरे महाराष्ट्र दौऱ्यानंतर आता चारा छावण्यांची पाहणी करणार आहे. २ मेपासून राज यांचा हा छावणी दौरा सुरू होईल. याकाळात ते मनसेनं स्थापन केलेल्या चारा छावण्यांनाही भेट देणार आहेत. सातार्यामजवळच्या गोंदवले गावापासून हा दौरा सुरू होतोय. आणि औरंगाबादच्या फुलंब्रीमध्ये या दौऱ्याचा समारोप होईल.
First Published: Thursday, April 25, 2013, 16:42