`...तर PWD च्या मंत्र्याकडे किती संपत्ती?` , Raj Thackrey On Bhujbal

`...तर PWD च्या मंत्र्याकडे किती संपत्ती?`

`...तर PWD च्या मंत्र्याकडे किती संपत्ती?`
www.24taas.com, मुंबई

नाशिकच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लाचखोर अभियंता सतिश चिखलीकर याच्या संपत्तीच्या सुरस कहाण्यांनी केवळ सामान्यांनाच नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही आश्चर्यचकीत केलंय. पण, राज ठाकरे यांना मात्र या कहाण्या ऐकल्यानंतर वेगळाच प्रश्न पडलाय.

‘एका पीडब्लूडीच्या इंजिनिअरकडे एवढी संपत्ती असेल तर पीडब्लूडीच्या मंत्र्याकडे किती संपत्ती असेल?’ असा प्रश्न राज ठाकरे यांना पडलाय. आपल्या विशेष शैलीत त्यांनी तो पत्रकारांसमोरही तेवढ्याच खुबीनं मांडला. ‘आपल्याला शाळेतल्या गणितात प्रश्न असतात ना की, एक डझन आंब्यांना अमूक अमूक पैसे लागतात तर ... आंब्यांना किती पैसे... तसाच प्रश्न आहे की एका पीडब्लूडीच्या इंजिनिअरकडे एवढी संपत्ती असेल तर पीडब्लूडीच्या मंत्र्याकडे किती संपत्ती असेल?’

असं साधं-सोपं गणित मांडत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अप्रत्यरित्या सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना टोला लगावलाय. यावेळी इंजिनिअरच्या संपत्तीचे आकडे ऐकून धक्का बसल्याचं राज ठाकरेंनी म्हटलंय.

First Published: Tuesday, May 7, 2013, 17:15


comments powered by Disqus