Last Updated: Saturday, March 9, 2013, 08:06
www.24taas.com, मुंबईटाटा उद्योग समूहाचे माजी अध्य़क्ष रतन टाटा यांनी कृष्णकुंजवर राज यांची भेट घेतली. राज ठाकरेंनी टाटा यांचं स्वागत केलं. टाटा यांनी राज यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत राज ठाकरेंना एक खास अशी भेट रतन टाटा यांनी दिली..
या भेटीत रतन टाटांनी खास स्वत: डिझाईन केलेलं घड्याळ राज ठाकरेंना भेट दिलं. तर राज ठाकरेंनी आर्टिस्टिक पुस्तकांची भेट त्यांना दिली. ही सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं जात असलं तरी भेटीचे `राज` मात्र गुलदस्त्यातच आहेत...
रतन टाटा आणि ठाकरे कुटुंबीयांचे यांचे कायम जिव्हाळ्याचे संबंध राहिले आहेत... याआधीही रतन टाटांनी राज आणि मनसेच्या यशाचं कौतुक केलं होतं... आज पावणेचारच्या सुमाराला रतन टाटा कृष्णकुंजवर दाखल झाले. सुमारे तासभर त्यांच्यात चर्चा झाली.
First Published: Friday, March 8, 2013, 23:17