`राज ठाकरेंनी लोकसभा लढवू नये`- गडकरी Don`t contest loksabha, gadkari says to Raj Thackeray

`राज ठाकरेंनी लोकसभा लढवू नये`- गडकरी

`राज ठाकरेंनी लोकसभा लढवू नये`- गडकरी

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकसभा निवडणूक लढवू नये, अशी विनंती भाजप नेते नितिन गडकरी यांनी राज ठाकरे यांना केली.

राज ठाकरे यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलतांना गडकरींनी ही माहिती दिली.

मनसेला महायुतीत आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं भाजप नेते नितिन गडकरी असेही त्यांनी यावेळी म्हटलंय.

काँग्रेसविरोधी मतांचं विभाजन नको, मागील लोकसभा निवडणुकीत झालेल्या नुकसानाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ही भेट घेतल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

मनसेने निवडणूक लढवली नाही तर, एनडीए मजबूत होईल, असंही मत नितिन गडकरींनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान उद्धव ठाकरे यांनी नितिन गडकरी आणि राज ठाकरे भेटीवर नाराजी व्यक्त केली असल्याचं सांगण्यात येतंय.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, March 3, 2014, 19:24


comments powered by Disqus