Last Updated: Wednesday, March 5, 2014, 19:30
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्लीदिल्लीत आप पक्षाचे कार्यकर्ते भाजप कार्यालयासमोर जमले आहेत. आप आणि भाजपचे कार्यकर्ते समोरासमोर येऊन जोरदार घोषणाबाजी करतायत.
दरम्यान घोषणाबाजी करत असतांना आपच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयासमोर रस्त्यावर बसूनच ठिय्या दिला आहे.
अरविंद केजरीवाल यांचा गुजरात दौरा सुरू आहे. नरेंद्र मोदी यांचं गुजरात विकासाचं मॉडेल नेमकं आहे तरी काय? हे पाहण्यासाठी अरविंद केजरीवाल सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत.
या दरम्यान पाटनमध्ये आज अरविंद केजरीवाल यांचा रोड शो होता. तो रोड शो पोलिसांनी आचार संहितेचं कारण सांगून बंद केला.
अरविंद केजरीवाल यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची बातमीही आली होती. मात्र पाटनच्या पोलिस अधिक्षकांनी ही बाब फेटाळून लावली आहे.
ही बातमी आपच्या कार्य़कर्त्यांमध्ये पोहोचल्यानंतर त्यांनी दिल्लीतील भाजप कार्यालयासमोर निदर्शनं केली आहेत.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, March 5, 2014, 18:54