मुंबईत राज ठाकरे आणि नितीन गडकरींची गुफ्तगू raj Thackeray and nitin gadkari meet in mumbai

मुंबईत राज ठाकरे आणि नितीन गडकरींची गुफ्तगू

मुंबईत राज ठाकरे आणि नितीन गडकरींची गुफ्तगू

www.24taas.com

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांची मुंबईतल्या पंचतारांकीत हॉटेलमध्ये भेट झाली.

या भेटीत आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची शक्यता आहे.

आपली नितिन गडकरी यांच्याशी भेट झाल्याचं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र बैठकीत काय चर्चा झाले हे उघड करण्यास राज ठाकरे यांनी नकार दिला आहे.

तसंच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही नव्या समीकरणांबाबत चर्चा झाल्याचं बोललं जातंय.

यापूर्वी राजकीय चर्चेला उधाण आलं होतं, जेव्हा नाशिकमध्ये गोधापार्कच्या उदघाटनासाठी नितिन गडकरी आणि राज ठाकरे एकाच व्यासपिठावर आले होते.

मात्र चांगल्या कामांसाठी राजकारण करू नका, असं नितिन गडकरी यांनी म्हटलं होतं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, March 3, 2014, 16:02


comments powered by Disqus