राहुल गांधींची पप्पी घेणारी महिला जिवंत woman burnt was not one who kissed rahul gandhi says assam p

राहुल गांधींची पप्पी घेणारी महिला जिवंत

राहुल गांधींची पप्पी घेणारी महिला जिवंत
www.24taas.com, झी मीडिया, जोरहट

राहुल गांधी यांची पप्पी घेणारी महिला जिवंत आहे, ज्या महिलेचा जळून मृत्यू झाला, ती महिला दुसरीच होती, असा दावा आसाम पोलिसांनी केला आहे.

राहुल गांधी यांना किस करणारी महिला, नवरा-बायकोच्या भांडणात जळून मृत्युमुखी पडल्याची बातमी माध्यमांमध्ये पसरली होती. ज्या महिलेचा मृत्यू झाला.

ती महिला काँग्रेसचीच कार्यकर्ता होती, मात्र ही महिला राहुल गांधी यांच्या बैठकीला उपस्थित नसल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. या प्रकरणाची अजून चौकशी सुरू आहे.

आसामच्या जोरहटमध्ये बुधवारी जेव्हा राहुल गांधी महिला काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत बसले होते, तेव्हा त्यातील काही महिलांनी राहुल गांधी यांचे कौतुकाने पापे घेतले होते.

या किसच्या पावसात राहुल गांधी लाजले आणि लाल लालही झाले होते.

हा किस्सा किसचा मात्र पुढे आज वाढला. कारण ज्या महिलेने राहुल गांधी यांचा किस घेतला तिचा मृत्यू झाल्याची बातमी आली. मात्र ही महिला दुसरी असं पोलिसांनी स्पष्ट केलंयय

त्यातील एक महिलेचं या पप्पीवरून नवऱ्याशी बिनसल्याचं सांगण्यात आलं. राहुल गांधी यांच्या बुधवारच्या बैठकीत हे सारं घडलं.

यावरून या महिलेच्या घरात तणाव असल्याचं सांगण्यात आलं. मात्र आज ही महिला ती नव्हती, तसेच ही महिला सुरूवातील राहुल गांधी यांना भेटली होती.

मात्र ती राहुल गांधी यांच्या `किस`वाल्या बैठकीला उपस्थित नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, March 1, 2014, 20:16


comments powered by Disqus