|
 |
करंजी |
|
www.24taas.com ,मुंबई
साहित्य - मैदा, मैदा भिजवण्या साठी दूध, तळण्यासाठी साजूक तूप.
सारणाची सामग्री – खिसलेलं खोबरं, पिठी साखर, मावा, काजू, किसमिैस, बदाम, खसखस, चारोळे, वेलची पूड, जायफळ पूड.
कृती – मैदा बारीक चाळणीने चाळून घ्या. त्यात मोहन घालून दुधात मळून घ्या. आतील सारणासाठी खिसलेलं खोबरं, पिठीसाखर घाला. एका कढईत मावा घेऊन मंद आचेवर गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्या. हा मावा थंड झाल्यावर वरील सारणात मिळवा. यात काजू बदामाचे तुकडे करून टाका. खसखस, चारोळ्या, इलायची पूड, जायफळ पूड टाकून सर्व मिश्रण एकजीव करा. भिजवलेल्या मैद्याचे छोटे गोळे तयार करा. प्रत्येक गोळ्याला गोल आकारात लाटून घ्या. त्यात वरील सारण भरून करंजीचा आकार द्या. एका कढईत तूप गरम करून करंज्या मंद आचेवर खरपूस तळून घ्या.
First Published: Monday, October 22, 2012, 17:07
|
प्रतिक्रिया
प्रतिक्रिया द्या
|
|
|
|
|