कडे नाही कोर्टात जा - पवारांचा सल्ला, sharad pawar on kejriwal about vadra

सरकारकडे नाही कोर्टात जा - पवारांचा सल्ला

सरकारकडे नाही कोर्टात जा - पवारांचा सल्ला
www.24taas.com, नवी दिल्ली
सोनिया गांधीचे जावई रॉबर्ट वढेरा यांनी बेकायदा संपत्ती गोळा केल्याचे काही पुरावे असतील तर अरविंद केजरीवाल कोर्टात जाऊ शकतात, असा सल्ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलाय.

केजरीवाल यांनी रॉबर्ट वढेरा आणि डीएलएफ या कंपनीच्या व्यावहारिक संबधांबाबत आरोप केले होते. या प्रकरणी त्यांनी सरकारकडे न्यायालयीन चौकशीची मागणीही केलीय. केजरीवालांनी सरकारकडे मागणी करण्याऐवजी त्यांच्याकडं कोर्टात जाण्याचा पर्याय असल्याचं शरद पवार यांनी म्हटलंय.

प्रियंका गांधी यांचे पती आणि सोनिया गांधी यांचा जावई रॉबर्ट वडेरा यांनी गेल्या ४ वर्षात सुमारे ३०० कोटी रुपयांची संपत्ती कमावली असल्याचे सणसणीत आरोप इंडिया अगेन्स्ट करप्शनचे सदस्य अरविंद केजरीवाल यांनी केलाय.


First Published: Monday, October 8, 2012, 13:02


comments powered by Disqus