Last Updated: Tuesday, January 15, 2013, 15:32
www.24taas.com, मुंबईमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याची अंडर-१४ मधील टीममध्ये सिलेक्शन झाल्याने, ज्युनिअर क्रिकेटमध्ये ज्यांचे सिलेक्शन झालं नाही, अशा खेळाडूंच्या आई-वडिलांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या या निर्णयावर मात्र अनेकजण नाराज असल्याचे समजते. एका रिपोर्टच्या मते, एका खेळाडूने, ट्रिपल सेंच्युरी झळकावली आहे. तर एका खेळाडूने चार डबल सेंच्युरी केल्या आहेत. तर एका खेळाडूने नऊ शतके केली आहेत. आणि तरीही अर्जुन तेंडुलकरचं सिलेक्शन झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. जेव्हा की, अर्जुनचा सर्वाधिक स्कोर फक्त १२४ आहे.
अर्जुन तेंडुलकरच्या सिलेक्शनबाबत अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. त्यामुळे अनेकजणांच्या मते, ज्या खेळाडूंनी धावाच्या राशी ओतल्या आहेत. असे खेळा़डू बाहेर बसविल्याने आणि फक्त एका शतकाच्या जोरावर अर्जुनचे टीममध्ये सिलेक्शन झालेच कसे असा प्रश्न साऱ्यांना पडला आहे.
First Published: Tuesday, January 15, 2013, 15:15