Last Updated: Monday, October 14, 2013, 20:39
www.24taas.com ,वृत्तसंस्था, मुंबईमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर क्रिकेटमधून निवृत्त झाला तरी त्याचे योगदान पुढच्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील. अशा प्रकारच्या काही भावना आहेत बॉलिवूडच्या क्रिकेटप्रेमींच्या. क्रिकेटचा बादशाह सचिनने मागील सप्ताहात निवृत्तीची घोषणा केली आहे. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या वेस्टइंडीज मालिकेतील शेवटच्या कसोटीनंतर आपण निवृत्त होणार असल्याचे मास्टर ब्लास्टरने बीसीसीआयला कळविले होते. आता सचिन खेळतांना दिसणार नाही ही भावना क्रिकेटरसिकांना सतावत आहे. तसेच बॉलिवूडचे तारेही थोडे नाराज आहेत. या आहेत काही प्रतिक्रिया-
> नसीरुद्दीन शाह : हे खूप दु:खद आहे, मात्र अपेक्षित होतं. आपल्याला इतके वर्ष चांगल्या खेळी दाखवल्याबद्दल आपण आभार मानायला पाहिजे. त्यांच्या उर्वरित आयुष्यासाठी माझ्या शुभेच्छा.
> कबीर बेदी : भारतचा महान क्रिकेट खेळाडू निवृत्त होत आहे. तो फक्त क्रिकेट खेळण्यातून निवृत्ती घेत आहे. तो कायमच क्रिकेटचा आयकॉन राहील.
> नवाजुद्दीन सिद्धीकी : क्रिकेटचा महान आदर्श सचिन तेंडुलकर आहे. त्याच्या खेळींमुळे जीवनात प्रेरणा मिळते. सचिनची जागा कोणीच घेऊ शकत नाही.
> सोनू सूद : सचिन तेंडुलकर शिवाय क्रिकेट पूर्ण होऊ शकत नाही. मला वाटतं की, सचिनच्या निवृत्तीने करोड़ों क्रिकेटप्रेमींची रूची कमी होऊ शकते. मलाही वाटत नाही मी आधीच्याच उत्सुकतेने मॅच बघेल.
> शैलेंद्र सिंह (निर्माता) : एका बाबीचा अंत कायम दूसऱ्याची सुरुवात असतो. सचिनचे मैदानवरचे कार्य झाले. आता तो मैदानाबाहेर कसे काम करतो हे बघणे रंजक ठरेल.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, October 14, 2013, 20:26