'...स्वत:बद्दल शाश्वती नव्हती, म्हणून निवृत्ती', Didn`t see myself playing 2015 WC, so quit: Sachin

'...स्वत:बद्दल शाश्वती नव्हती, म्हणून निवृत्ती'

'...स्वत:बद्दल शाश्वती नव्हती, म्हणून निवृत्ती'
www.24taas.com, नवी दिल्ली

२०१५ च्या वर्ल्डकप टीममध्ये खेळताना मी स्वत:ला पाहू शकलो नाही त्यामुळेच टीम इंडियाचं हित लक्षात घेऊन वन डे क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला, असं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यानं म्हटलंय.

भारतीय क्रिकेट टीममधील सीनिअर खेळाडू असलेला सचिन म्हणतो, ‘टीममध्ये खेळण्यासाठी टूर्नामेंटच्या अगोदरच योग्य खेळाडूंचा शोध घेण्यासाठी मी उचलेललं पाऊल योग्यच होतं. २०१५ चा वर्ल्डकप ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये आयोजित केला जाणार आहे. या वर्ल्डकपमध्ये पुन्हा एकदा भारतानं वर्चस्व राखावं, यासाठी टीमचे चाललेले प्रयत्न पाहता माझा निर्णय योग्यच होता’.

‘मला वाटलं की, २०१५ मध्ये आम्ही जेव्हा ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये जाऊ तेव्हा ट्रॉफी पटकावण्यासाठी आम्ही टीम म्हणून सज्ज असणं गरजेचं होतं आणि मला स्वत:ला २०१५ च्या वर्ल्डकपमध्ये मी खेळेन असं वाटत नव्हतं... त्यामुळे स्वत:ला हटवून इतरांसाठी मार्ग मोकळा करणं हेच योग्य होतं. भारतीय टीमला आणखी पुढे जायला हवं. २०१५ साठी योग्य अशी टीम बनायला हवी’ असं सचिननं म्हटलंय.

मागच्याय वर्षी डिसेंबरमध्ये वनडे क्रिकेटमधून सचिननं निवृत्ती जाहीर केली होती.

First Published: Tuesday, February 5, 2013, 09:02


comments powered by Disqus