सचिन, युवीने सावरले, India vs England Live Score England tour of India 2012-13

सचिन, युवीने सावरले

सचिन, युवीने सावरले
www.24taas.com, कोलकता
गेल्या अनेक इनिंगपासून चाहत्यांना ज्या इनिंगची अपेक्षा होती तशी इनिंग सध्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर खेळत असून तो सध्या ५७ धावांवर खेळत आहे. तर दुसऱ्या बाजूला त्याची झुंजार खेळाडू युवराज सिंग त्याला चांगली साथ देत आहे.

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी वेगवान सुरवातीनंतर भारतीय संघाची घरगुंडी सुरू झाली असताना सचिनने एक बाजू लावून धरली. त्यामुळे पहिल्या दिवशी चहापानापर्यंत भारताने ४ बाद १७२ धावांपर्यंत मजल मारली. शेवटचे वृत्त हाती लागले तेव्हा तेव्हा सचिन ५७, तर युवराज सिंग २३ धावांवर खेळत होता.

नाणेफेक जिंकून भारताने फलंदाजी स्वीकारल्यानंतर वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर यांनी धडाक्या त सुरवात केली. त्यांनी १० षटकांतच ४७ धावांची सलामी दिली. पण एका चेंडूवर तिसरी धाव घेताना सेहवाग धावबाद झाल्याने ही जोडी फुटली. त्यानंतर या मालिकेतील "रन मशिन` चेतेश्वएर पुजारा मॉन्टी पानेसरच्या एका चेंडूवर त्रिफळाबाद झाला.

एका बाजूने गंभीर सुरेख अर्धशतक झळकावत असताना सचिन अडखळत, पण प्रचंड एकाग्रतेने खेळत होता. त्याने पानेसरची दोन षटके निर्धाव खेळून काढली. मात्र, हळूहळू त्याला लय सापडली आणि त्याने काही देखणे फटकेही मारले. गंभीर बाद झाल्यानंतर विराट कोहलीही लगेच बाद झाला. त्यावेळी इंग्लंडने अचूक गोलंदाजी आणि आक्रमक क्षेत्ररचना करत भारताचा धावांचा वेग कमी केला. सध्या सचिन आणि युवराजने इंग्लिश गोलंदाजांना समर्थपणे तोंड देत आहेत.

First Published: Wednesday, December 5, 2012, 14:24


comments powered by Disqus