Last Updated: Friday, October 11, 2013, 19:31
www.24taas.com , वृत्तसंस्था, कराची सचिनच्या निवृत्तीवर पाकिस्तानी खेळांडूनी उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. पाकिस्तानी ऑलराउंडर शाहिद आफ्रिदी आणि इतर माजी खेळांडूनी मास्टर ब्लास्टरचे कौतुक केले आहे. सचिनने २०० वी टेस्ट खेळून निवृत्त होण्याचा निर्णय काल बीसीसीआयला कळवला आहे.
शाहिद आफ्रिदी‘तेंडुलकरमध्ये क्रिकेट ठासून भरलेलं आहे. सचिनची तुलना कोणासोबतही होऊच शकत नाही. त्याच्या विरूद्ध मी खूप खेळलोय व्यक्ती म्हणूनही तो महान आहे. तो पक्का व्यावसायिक खेळाडू आहे. त्याचे रेकॉर्ड बरेच दिवस अबाधित राहतील,’ अशा शब्दात शाहिद आफ्रिदीने सचिनच्या निवृत्त होण्याचा निर्णयावर आपल्या भावना व्यक्त केल्या.
जावेद मियांदादपाकिस्तानचे माजी कर्णधार जावेद मियांदादने म्हटलंय की, ‘सचिन तेंडुलकर हा भारतीय क्रिकेटमध्ये खूप खेळांडूचा रोल मॉडल आहे. त्याचमुळे भारतात फलंदाजाची नवी पिढी तयार झाली आहे.’
मोहसिन खानपाकिस्तानचा माजी कोच आणि सलामीचा फलंदाज मोहसिन खान म्हणतो, ‘मला कायमच सचिनला खेळतांना बघतांना आवड असे. तो एक परिपूर्ण फलंदाज आहे. त्याच टायमिंग आणि संतुलन लाजवाब आहे.’
राशिद लतीफ‘भारताने अनेक फलंदाज जागतिक क्रिकेटला दिले आहेत. सचिन त्या सर्वांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे. तो वेगळा आहे कारण तो आजही धावांचा भूकेला आहे. हे उद्गार आहेत माजी कर्णधार राशिद लतीफ याचे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, October 11, 2013, 19:31