सचिनने घेतली ठाकरे कुटुंबीयांची भेट , Sachin meet Thackeray family 0n Matosri

सचिनने घेतली ठाकरे कुटुंबीयांची भेट

सचिनने घेतली ठाकरे कुटुंबीयांची भेट
www.24taas.com,मुंबई

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं काल रात्री मातोश्रीवर ठाकरे कुटुंबीयांची भेट घेतली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर सचिनला बाळासाहेबांचे दर्शन घ्यायचे होते. मात्र, तो येवू शकला नाही.

बाळासाहेब ठाकरेंच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पण त्यावेळी सचिन तेंडुलकर अहमदाबादमध्ये टेस्ट मॅच खेळत होता. त्यामुळे तो बाळासाहेबांच्या अंत्यदर्शनासाठी येऊ शकला नाही.

बाळासाहेबांच्या निधनानंतर सचिननं ट्विटरवरुन श्रद्धांजली अर्पण केली होती. त्याचबरोबर अहमदाबादमध्ये टेस्ट मॅचमध्ये असल्यानं अंत्यदर्शनाला उपस्थित राहू शकणार नाही, याबद्दल दुःखही व्यक्त केलं होतं.

अहमदाबाद टेस्ट संपताच सचिन मातोश्रीवर पोहोचला आणि त्यानं उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्याच्यासोबत पत्नी अंजलीही होती. सचिनने ठाकरे कुटुंबियांचे सांत्वन केले.

First Published: Tuesday, November 20, 2012, 11:35


comments powered by Disqus