निवृत्तीनंतर काय आहे सचिनचा प्लान?, sachin tendulkar`s plan after retirement

निवृत्तीनंतर काय आहे सचिनचा प्लान?

निवृत्तीनंतर काय आहे सचिनचा प्लान?

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर सचिन तेंडुलकर आता निवांत आहे. आपल्या मुलांना आणि कुटुंबाला दिलेल्या शब्दानुसार सचिननं आता त्यांना वेळ द्यायचं ठरवलंय. त्यासाठी तो लवकरच भारताबाहेर फिरायला जाणार आहे.

बाहेर फिरायला गेल्यानंतर कुणीही ओळखू नये आणि कुटुंबासोबत वेळ घालवताना व्यत्यय येऊ नये, अशी सचिनची इच्छा आहे. त्यासाठी कुणीही आपल्याला ओळखणार नाही, अशा ठिकाणी सचिनला फिरायला जायचंय. त्यामुळे ‘लंडन’मध्ये क्रिकेट हा खेळच अस्तित्वात नसलेल्या देशात सचिन आपल्या कुटुंबासोबत जाणार असल्याचं, सचिनची सासू अनाबेल मेहता यांच्याकडून मिळाल्याचे `संडे टाईम्स` या वृत्तपत्रात म्हटले आहे. ‘आयलँड’ या देशात क्रिकेट खेळले जात नाही तसेच या ठिकाणी सचिनला अनेकजण ओळखत नाही. त्यामुळे आयलँडसारख्या देशात पिकनिकसाठी सचिन जाईल, असं अनाबेल यांनी म्हटलंय.

निवृत्ती जाहीर केल्यानंतर वानखेडे मैदानावर सचिननं केलेल्या जाहीर भाषणात सारा आणि अर्जुनला पुरेसा वेळ देणार असल्याचं म्हटलं होतं. त्यातचं सचिनला ‘भारतरत्न’ पुरस्कार जाहीर झाल्यानंतर संपुर्ण कुटुंबाचा आनंद द्विगुणित झाला. हा आनंद साजरा करण्यासाठी सचिन परदेशात जाणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, November 18, 2013, 16:07


comments powered by Disqus