सचिनबरोबर दहा नंबरची जर्सीही निवृत्त!, Sachin Tendulkar’s No 10 jersey retired

सचिनबरोबर दहा नंबरची जर्सीही निवृत्त!

सचिनबरोबर दहा नंबरची जर्सीही निवृत्त!
www.24taas.com, वृत्तसंस्था, मुंबई

सचिनची दहा नंबरची जर्सी एव्हाना प्रेक्षकांच्या चांगलीच डोक्यात उतरलीय. सचिन निवृत्ती घेणार म्हटल्याबरोबर ही जर्सी कुणाच्या अंगावर दिसणार? असाही प्रश्न अनेकांना पडला होता. पण, याचं उत्तर मुंबई इंडियन्सच्या मालक आणि मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी दिलंय.

‘सचिनबरोबरच त्याची दहा नंबरची जर्सीही निवृत्त होणार आहे... हा एकप्रकारे सचिनचा सन्मानच आहे’ असं नीता अंबानी यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे दहा नंबरची जर्सी ही ‘सचिनची जर्सी’ म्हणूनच यापुढेही ओळखली जाईल, ही जर्सी कुणालाही देण्यात येणार नाही हे स्पष्ट झालंय. क्रिकेट जगतात पहिल्यांदाच या पद्धतीनं कुणाला तरी मानवंदना मिळतेय.

`एकाच सत्रामध्ये आयपीएल विजेता आणि चॅम्पियन्स लीग विजेता होणं ही संघासाठी खरचं खूप मोठी गोष्ट आहे. मात्र सचिनच्या निवृत्तीचा क्षण आम्हा साऱ्यांसाठी खूपचं भावूक होता. यामुळेच सचिनच्या आवडत्या क्रमांकाची जर्सी ही त्याच्यासोबतच निवृत्त करणात आली आहे. ती जर्सी सचिनची होती... आणि यापुढेही ती फक्त सचिनचीच राहील, असं नीता अंबानी यांनी म्हटलंय.

२०० टेस्ट पूर्ण झाल्यानंतर सचिन पुढच्या महिन्यात निवृत्ती स्वीकारणार आहे. याआधीच त्यानं टी-२० आणि वन-डे मधूनही निवृत्ती घेतलीय. नीता अंबानींच्या या स्पष्टीकरणामुळे सचिनच्या चाहत्यांना मात्र सुखद धक्का बसलाय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, October 13, 2013, 17:59


comments powered by Disqus