`निवृत्तीनंतरही क्रिकेटला देणार योगदान`, sharad pawar meet sachin tendulkar

`निवृत्तीनंतरही क्रिकेटला देणार योगदान`

`निवृत्तीनंतरही क्रिकेटला देणार योगदान`
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

रिटायरमेंटनंतर आपण क्रिकेट प्रशासनाला पाठिंबा देणार असल्याचं आश्वासन क्रिकेटर आणि खासदार सचिन तेंडुलकरनं आपल्याला दिलं असल्याची माहिती केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी दिलीय.

सचिनच्या रिटायरमेंटच्या घोषणेच्या दुसऱ्या दिवशी आपण सचिनशी बातचीत केली... त्यावेळी आपण त्याला भारतीय क्रिकेटला अधिक पुढे नेण्यासाठी क्रिकेट प्रशासनात तू आल पाहिजेस, असं सांगितलं, असं शरद पवार यांनी म्हटलंय.

सचिनलादेखील यामुळे अधिक आनंद झाला असून त्यानं आपली विनंती मान्य केलीय. ‘मला निवृत्त झाल्यानंतरही क्रिकेटची सेवा करायला अधिक आवडेल’ असं सचिननं पवारांशी बोलताना म्हटलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, October 12, 2013, 19:24


comments powered by Disqus