`सध्या टीम इंडियाला सचिनची जास्त गरज` , team india need sachin, said dravid

सध्या टीम इंडियाला सचिनची जास्त गरज - द्रविड

सध्या टीम इंडियाला सचिनची जास्त गरज - द्रविड
www.24taas.com, नवी दिल्ली

खराब फॉर्मच्या चक्रव्युहात अडकलेल्या सचिनवर निवृत्तीसाठी दबाव दिसून येतोय. पण भारतीय टीमची वॉल असलेल्या राहुल द्रविडला मात्र तसं वाटत नाही. राहुलच्या मते, टीम इंडियाल आत्ता खरी सिनीअर खेळाडूची गरज आहे.

इंग्लंडविरुद्धच्या चार टेस्टच्या साखळी मॅचदरम्यान पहिल्या दोन मॅचमध्ये सचिनचा बॅटींग चाहत्यांना खूश करू शकली नाही. १-१ अशा बरोबरीनं सध्या दोन्ही टीम पुढच्या मॅचसाठी सज्ज झालेल्या आहेत. अशावेळी सिनिअर खेळाडूंचं टीममध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे आणि यासाठी सचिनपेक्षा आणखी योग्य व्यक्ती कोण असू शकते, असं द्रविडनं म्हटलंय.

‘सचिनची खेळी फार चांगली झाली नाही. तसंच तो न्युझीलंडविरुद्धच्या मॅचसाठीही पूर्णत: तयार दिसत नव्हता. लागोपाठ तीन मॅचमध्ये खराब प्रदर्शनानंतर तो आता पुन्हा सज्ज झालाय असं दिसतंय. अहमदाबादमध्ये त्याने खेळलेले शॉटसनं त्याला निराश केलं आणि अशा सपाट पीचवर इतर खेळाडूंना रन्स बनवताना पाहणंही निश्चितपणे त्याच्यासाठी निराशाजनक ठरलं असेल. तो सकाळीच ज्या बॉलवर आऊट झाला तो खरंच खूप स्पीन करत होता. त्यानंतर मात्र बॉलला जास्त स्पीन जाणवत नव्हता’ असं म्हणत द्रवीडनं सचिनबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. त्याबरोबरच तो म्हणतो, भारतीय टीमला मुंबई टेस्टमध्ये मिळालेली मात थोडीशी फायदेशीरही ठरू शकते. कारण त्यामुळे खेळाडू जास्त मेहनत घेतील’.

‘महेंद्रसिंग धोनीला पाच डिसेंबरपासून कोलकातामध्ये सुरू होणाऱ्या तिसऱ्या टेस्टमॅच अगोदर बॉलिंगसाठी पर्यायांवर चांगलाच विचार करावा लागणार आहे. तीन स्पिनर्ससोबत खेळणं थोडं अवघडच जाईल, आणि तेही युवराज सिंह आणि वीरेंद्र सेहवागसारखे स्पीनर्स टीममध्ये उपलब्ध असताना’ असा प्रेमळ सल्लाही द्रविडनं कॅप्टन कूल धोनीला दिलाय.

First Published: Wednesday, November 28, 2012, 15:29


comments powered by Disqus