टीम इंडियाच्या जर्सीवर... सचिन रमेश तेंडुलकर!, Team India wear specially-designed Sachin Tendulkar jerseys

टीम इंडियाच्या जर्सीवर... सचिन रमेश तेंडुलकर!

टीम इंडियाच्या जर्सीवर... सचिन रमेश तेंडुलकर!

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

भारतीय क्रिकेट बोर्डाच्या क्रिकेट इतिहासातील सर्वांत महान बॅट्समन सचिन तेंडुलकरच्या सन्मानार्थ आपल्या पारंपरिक गणवेशाला फाटा देत चक्क सचिन रमेश तेंडुलकर २०० वी टेस्ट असं छापलेली जर्सी तयार केली आहे.

आज वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू झालेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये ही जर्सी घालून भारतीय टीम खेळायला उतरली. ही टेस्ट मॅच सचिनच्या आंतराष्ट्रीय टेस्ट क्रिकेट कारकीर्दीतील २०० वी आणि अखेरची मॅच आहे.

यापूर्वी इतर कुठल्याही क्रिकेटरचा असा गौरव करण्यात आला नव्हता. अगदी सुनील गावस्कर शेवटची मॅच खेळत असतानाही अशा प्रकारे त्याचा सत्कार केला गेला नव्हता. समालोचन करणाऱ्या समालोचकांनीही एसआरटी २०० असं लिहिलेलं खास जॅकेट घातलं होतं. आज सकाळी नवं जॅकेट आल्याचं हर्ष भोगले यांनी ट्विट केलं होतं.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, November 14, 2013, 22:35


comments powered by Disqus