...जेव्हा सचिन तेंडुलकरला भेटला ओसामा, When Tendulkar was stumped by little `Osama`

...जेव्हा सचिन तेंडुलकरला भेटला ओसामा

...जेव्हा सचिन तेंडुलकरला भेटला ओसामा
www.24taas.com, कोलकत्ता
नावात काय आहे असे म्हटले जाते, पण मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला एका अशा घटनेला सामोरे जावे लागले की त्याला म्हणावे लागले नावातच काही तरी खास आहे. तेंडुलकरने आपल्या २३ वर्षांच्या करीअरमध्ये शोएब अख्तर, ब्रेट ली अशा खतरनाक गोलंदाजांचा सामना केला पण २००३-०४ मध्ये पाकिस्तानात दौऱ्यात त्याचा सामना एका व्यक्तीशी झाला आणि त्याचे नाव ऐकले आणि तो थोडासा घाबरला.

पाकिस्तान दौऱ्याच्या वेळी तेंडुलकरने शौकत खानूम स्मृति कॅन्सर हॉस्पिटलला भेट दिली. त्यावेळी त्यांनी अनेक रुग्णांना भेट दिली. पण त्यातील एका रुग्णाला भेटायला गेला. हा रुग्ण तेंडुलकरचा चाहता असल्याचे सांगण्यात आले. यावेळी तेंडुलकरने त्या रुग्णाला आपले नाव विचारले तेव्हा त्या रुग्णाच्या बहिणींने त्वरित म्हटले त्याचे नाव ऐकल्यावर तुम्ही घाबरून जाल. तेव्हा सचिनची उत्सुकता चाळवली आणि त्याने तरी त्याला नाव विचारले, त्यावर त्या मुलाने सांगितले मैं ओसामा हू. मैदानाच्या बाहेर घडलेल्या जबरदस्त घटनेपैकी एक असल्याचे तेंडुलकर याने सांगितले.

बंगाली फोटो पत्रकार सुमन चटोपाध्याय याच्या पुस्तकाच्या प्रकाशन सचिन तेंडुलकर याच्या हस्ते झाले. त्यावेळी सचिन बोलत होता. यावेळी त्याने अनेक आठवणीतील किस्से सांगितले.

First Published: Monday, December 3, 2012, 16:32


comments powered by Disqus