मी साताऱ्यात येतो, लक्ष्मण माने काळे फासाच - कोत्तापल्ले , marathi sahitya sanmelan in chiplun, ratnagiri

साताऱ्यात येतो, लक्ष्मण माने काळे फासाच - कोत्तापल्ले

साताऱ्यात येतो,  लक्ष्मण माने काळे फासाच - कोत्तापल्ले
www.24taas.com, यशवंतराव चव्हाण साहित्य नगरी, चिपळूण

मी चिपळूणमध्ये आलोय ते त्वेषाने आलोय. मला धमकी दिली हे योग्य नाही. धमकी दिल्याची खंत आहे. मी साताऱ्यात जाणार आहे. तेथे जाऊन लक्ष्मण माने यांना सांगणार आता माझ्या तोंडाला काळे फासा, असे प्रति आव्हान समारोप भाषणात संमेलनाचे अध्यक्ष नागनाथ कोत्तापल्ले यांनी दिले.

अनेक वादांमुळे गाजलेल्या चिपळूणच्या ८६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज समारोप झाला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार होते. मात्र, ऐनवेळी या दोघांनीही समारोपाच्या कार्यक्रमाला दांडी मारली.

हा पूर्वनियोजित कार्यक्रम असूनही प्रमुख पाहुणे म्हणून हजर राहणार असलेल्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी साहित्य संमेलनाकडे पाठ फिरवल्यानं एवढ्या वर्षांची परंपरा खंडीत झालीये. त्यामुळे साहित्यप्रेमींमध्ये नाराजी होती.


कोत्तापल्ले म्हणालेत, विकास व्हायला हवा. विकास होत असताना पर्यावरणाचे रक्षण व्हायला पाहिजे. लेखकाला धमकी देणं सोपं. लेखकाला सुरक्षा नसते. लेखकामध्ये आणि नेत्यामध्ये फरक आहे. लेखकाजवळ कार्यकर्ते नसतात हे त्याचे बळ असते. तर त्याच्या उलट नेत्याकडे तितके कार्यकर्ते असतील तर त्याचे ते बळ असते. त्यावरून तो मोठा ठरतो. लेखक आणि राजकारणी यांच्यामध्ये सरमिसळ होत आहे. ती होता कामा नये.

मी चिपळूणमध्ये आलोय ते त्वेषाने आलोय. मला धमकी दिली हे योग्य नाही. धमकी दिल्याची खंत आहे. मी साताऱ्यात जाणार आहे. तेथे जाऊन लक्ष्मण माने यांना सांगणार आता माझ्या तोंडाला काळे फासा. तर पन्नास वर्ष साहित्य विश्वात घालविलेल्या ज्येष्ठ लेखक भालचंद्र नेमाडे यांनी टीका करणे योग्य नाही, असे ते म्हणालेत.

माणसांच्या अक्षरांवरील विश्वास उडणार नाही. त्याचे भान राखा, असे कळकळीचे आवाहन नागनाथ कोत्तापल्ले यांनी केले. कोणतेही भूमिका मांडताना समाज मन जपा. समाजासाठी भूमिका मांडा. सामान्य माणसाला बळ देणारं मूल्य म्हणजे ती भूमिका होय, असे ते म्हणाले.

सामान्य माणसाच्या हाती शस्त्र नाही. तर त्याच्या हातामध्ये नारायण सुर्वे आहेत. संत ज्ञानेश्वर, तुकाराम पाहिजे. तेच ग्रंथ त्यांचे शस्त्र आहे. मूल्यांची रूजवात आपल्या साहित्यातून झाली पाहिजे. जितकी मूल्य रूजवाल. तितके साहित्य हे दर्जेदार होते. मूल्याशिवाय साहित्य नको, अशी भूमिका समारोप भाषण्यात कोत्तापल्ले यांनी मांडली.

First Published: Sunday, January 13, 2013, 19:57


comments powered by Disqus