परशुरामाचे चित्र, संभाजी बिग्रेडचा संमेलानाला विरोध, Sambhaji Brigade protest on chiplun sahithya samyelan

परशुरामाचे चित्र, संभाजी बिग्रेडचा संमेलानाला विरोध

परशुरामाचे चित्र, संभाजी बिग्रेडचा संमेलानाला विरोध
www.24taas.com, चिपळूण

चिपळूण साहित्य संमेलनाला लागलेलं वादाचं ग्रहण संपता संपत नाहीये. ह.मो. मराठेंच्या उमेदवारीबाबतचा वाद, व्यासपीठाला बाळासाहेबांच्या नावाला विरोध, स्वागताध्यक्षपदावरुन रंगलेला वाद, यानंतर आता साहित्य संमेलनाच्या पत्रिकेवरील परशुरामाच्या चित्राचा वाद पुढं आलाय.

चिपळूण साहित्य संमेलन पुन्हा एकदा नव्या वादात अडकलं आहे.. परशुरामाच्या चित्रावरुन हा वाद रंगू लागला आहे.. निमंत्रण पत्रिकेवरील परशुरामाच्या चित्राला विरोध दर्शवत संमेलन उधळण्याचा संभाजी ब्रिगेडनं इशारा दिला आहे.. परशुरामाचे परशु पेनला जोडून छापणं आणि परशुरामाच्या चित्रावर संभाजी ब्रिगेडनं आक्षेप घेतला आहे.

तसंच परशुराम आणि साहित्याचा काय संबंध असा सवाल संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी उपस्थित केलाय. `महिलांची निर्घुणपणे हत्या करणारा परशुराम हा काय साहित्यिक होता का? असा प्रश्न प्रविण गायकवाड यांनी विचारला आहे. चिपळूणमध्ये साहित्य संमेलन होत असताना स्वातंत्र्यवीर सावरकर आणि लोकमान्य टिळकांचं नाव का वापरलं नाही असंही गायकवाड यांनी म्हटलं आहे`.

शिवाय कार्यक्रम पत्रिका कोणी बनवली आणि साहित्य संमेलन चालवतं कोण असाही प्रश्न गायकवाड यांनी उपस्थित केलाय. परशुरामाच्या चित्राला जातीय विरोधातून विरोध करत नसल्याचंही त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

First Published: Saturday, January 5, 2013, 17:42


comments powered by Disqus