संमेलनातल्या वादात आयोजकांची फोडणी - Marathi News 24taas.com

संमेलनातल्या वादात आयोजकांची फोडणी

www.24taas.com,  रत्नागिरी
 
रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण इथं होणा-या 86 वं अखिल भारतीय साहित्य संमेलन सुरू होण्याआधीच वादाचं ठरतंय. साहित्य संमेलनात विचारात घेतलं नसल्यामुळे आगपाखड करणा-या कोमसापला संमेलनाच्या आयोजकांनी आता डिवचलंय.
 
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि वाद असं समीकरणच झालंय. यंदाचं वादामुळे चिपळूणमध्ये होणारं 86 वं साहित्य संमेलन चर्चेत आलंय. या साहित्य संमेलनात विचारात घेतलं नाही आणि अध्यक्षपदाच्या रुसव्या फुगव्यामुळे कोमसापनं समांतर साहित्य संमेलनाची भाषा केली आहे.
 
कोमसापच्या या भूमिकेवर अध्यक्षपदाचे उमेदवार अशोक बागवेंनी तर तोफ डागलीच.मात्र त्याचबरोबर आयोजकांनीही कोमसापला टार्गेट करत कोमसाप समांतर साहित्य संमेलन घेत असेल तर त्यांचं स्वागत असल्याचं म्हटलंय. तसंच कोकणातल्या साहित्याचा ठेका कोमसापनं घेतलेला नसल्यामुळे कोकण ही त्यांची मक्तेदारी नव्हे अशा शब्दात कोमसापला फटकारलंय.
 
86 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडप्रक्रिया बाकी आहे.मात्र त्या अगोदर कोकणातल्या साहित्यिकांमध्ये वादाचे रंग भरू लागलेत.
 
 

First Published: Wednesday, August 1, 2012, 20:14


comments powered by Disqus