Last Updated: Thursday, March 21, 2013, 12:37
www.24taas.com, नवी दिल्ली१९९३ च्या बॉम्बस्फोटाप्रकरणी अभिनेता संजय दत्त याला पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या निकालाकडे साऱ्य़ांचेच लक्ष लागून राहिले होते. त्यामुळे संजय दत्त याला सगळ्यात मोठा झटका बसला आहे.
याआधी संजय दत्त याने १८ महिन्यांचा तरूंगावास भोगला होता. बेकायदा शस्त्रे बाळगल्या प्रकरणी ही शिक्षा ठोठावण्यात आली आहे. त्यामुळे संजय दत्तला आणि साडेतीन वर्षाची शिक्षा भोगावी लागणार आहे. संजय दत्तला सहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र, एक वर्ष कमी करून त्याला पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली.
संजय दत्त याने देखील कोर्टाचा निकाल मान्य केला आहे. संजय दत्तच्या वकिलांनी संजयला हा निर्णय मान्य असल्याचे सांगितले. संजय दत्तला चार आठवड्यात पोलिसांना शरण जावे लागणार आहे.
मुंबईमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी अभिनेता संजय दत्तच्या निर्दोष मुक्ततेला केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. बेकायदा शस्त्रे बाळगल्याप्रकरणी ‘टाडा' न्यायालयाचा संजय दत्तला दोषी ठरविण्याचा निर्णय कायम ठेवावा, अशी मागणी सीबीआयने केली होती.
First Published: Thursday, March 21, 2013, 12:07