संजय दत्तला जीवे मारण्याची धमकी! Anonymous letter claims threat to Sanjay Dutt’s life

संजय दत्तला जीवे मारण्याची धमकी!

संजय दत्तला जीवे मारण्याची धमकी!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

सिनेअभिनेता संजय दत्तला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. आर्थर रोड जेलला जीवे मारण्याच्या धमकीचे निनावी पत्र मिळाले असल्याची माहिती पोलीस महानिरीक्षक विनोद लोखंडे यांनी दिली.

धमकीच्या पार्श्वभूमीवर आर्थर रोड जेलसह संजय दत्तच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. संजय दत्त उद्या टाडा कोर्टाला शरण येणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तवच संजय़नं कोर्टात शरण येण्याऐवजी थेट येरवडा जेलमध्येच शरण येण्यास परवानगीसंदर्भात याचिका दाखल केली होती. मात्र नंतर संजयनं ही याचिका मागे घेतली. त्यानंतर हे धमकीचे पत्र मिळाल्यानं खळबळ उडाली आहे.

अभिनेता संजय दत्तनं येरव़डा जेलमध्ये शरणागतीची परवानगी मागणारा केलेला अर्ज मागं घेतला आहे. त्यामुळं उद्या संजय दत्तला टाडा कोर्टासमोरच शरण यावं लागणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Wednesday, May 15, 2013, 18:40


comments powered by Disqus