Last Updated: Thursday, March 21, 2013, 23:55
www.24taas.com, मुंबईबॉ़लीवूडच्या मुन्नाभाईला आता तुरुंगात जावं लागणार आहे..सर्वोच्च न्यायालयाने संजय दत्तला पाच वर्षांची शिक्षा सुनावलीय...संजय दत्तने यापूर्वीच १८ महिन्यांचा तुरुंगवास भोगला आहे..पण आता त्याला आणखी साडेतीन वर्षांची शिक्षा भोगावी लागणार आहे...संजय दत्त सध्या जामिनावर आहे..खरं तर टाडा कोर्टाने त्याला सहा वर्षाची शिक्षा ठोठावली होती..मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्याची शिक्षा एका वर्षाने कमी करुन ती पाच वर्ष केलीय...आता चार आठवड्यात संजय दत्तला कोर्टासमोर शरण जावं लागणार आहे....पण हे सगळ प्रकरण आहे तर काय? १९९३च्या बॉम्बस्फोट प्रकरणात संजय दत्तने नेमकी कोणती भूमिका बजावली होती?त्याला या प्रकरणात कधी अटक झाली होती? १९९३ ते २०१३ या दरम्यान संजय दत्तच्या प्रकरणात नेमकं काय घडलं? हे सगळं काही तुम्ही पहाणार आहात नायक ते खलनायक मध्ये ...
बेकायदा शस्त्र बाळगल्या प्रकरणी अभिनेता संजय दत्तला सर्वोच्च न्यायालयाने पाच वर्षाची शिक्षा सुनावलीय...टाडा कोर्टाने त्याला सहा वर्षाची शिक्षा ठोठावली होती..मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्याची शिक्षा एका वर्षाने कमी केलीय..
1993च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील अपीलांवर आज सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निकाल दिला...बॉलीवूडसह सा-या देशाचं लक्ष्य लागलं होतं ते अभिनेता संजय दत्तच्या निकालाकडं...संजू बाबाचं काय होणार याची सर्वांनाच उत्सुकता होती... बेदायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी टाडा कोर्टाने संजय दत्तला सहा वर्षाची शिक्षा ठोठावली होती...सर्वोच्च न्यायालयाने संजय दत्तची शिक्षा सहा ऐवजी ५ वर्ष केलीय...त्यामुळे आता संजय दत्तला तुरुंगात जावं लागणार हे निश्चित झालंय...याप्रकरणी संजय दत्तने १८ महिने तुरुंगात काढले असून आता त्याला उरलेले ४२ महिने अर्थात साडेतीन वर्ष शिक्षा भोगावी लागणार आहे....संजय दत्तला शरण येण्यासाठी चार आठवड्यांची मुदत देण्यात आलीय..
३१ जुलै २००७ मध्ये टाडा कोर्टाने संजय दत्तच्या प्रकरणाता फैसला सुनावला होता.. बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी टाडा कोर्टाने संजय दत्तला सहा वर्षाची शिक्षा ठोठावली होती...
मुंबई बॉम्बस्फोटाच्या कटात सहभागी असल्याच्या आरोपाखाली १९ एप्रिल १९९३ला मुंबई पोलिसांनी संजय दत्तला अटक केली होती..पण कटाच्या आरोपातून टाडा कोर्टाने त्याची सुटका केली होती..बॉ़म्बस्फोटाच्या कटात सहभागी असल्याच्या आरोपातून संजय दत्तची सुटाक झाली खरी पण बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी त्याला टाडा कोर्टाने दोषी ठरवून सहा वर्षाची शिक्षा ठोठावली...आणि आज सर्वोच्च न्यायालयाने त्याची शिक्षा एक वर्षाने कमी करुन पाच वर्षाच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केलं....त्यामुळे रुपेरी पडद्यावर गांधीगिरी करणा-या संजू बाबाला आता तुरुंगाच्या चार भिंतीआड साडेतीन वर्ष घालवाली लागणार आहेत..
संजय दत्तला आता तुरुंगात जावं लागणार आहे...पण ज्या प्रकरणासाठी त्याला शिक्षा झालीय...त्यामध्ये संजय दत्तची नेमकी कोणती भूमिका होती..पोलिसांनी त्याच्यावर कोणते आरोप ठेवले होते..
१२ मार्च १९९३ला साखळी बॉम्बस्फोट मालिकेनं मुंबई शहर अक्षरश: हादरुन गेलं होतं...देशाने पहिल्यांदाच भीषण बॉम्बस्फोटाचा अनुभव घेतला होता...या घटनेनंतर मुंबई पोलीसांनी वेगाने तपास सुरु केला...आणि तपासादरम्यान बॉलीवूड अभिनेता संजय दत्तचं नाव पुढं आलं...मॅग्नम व्हिडिओ कंपनीचा मालक समीर हिंगोरा आणि हनिफ कडावाला यांच्या चौकशीत संजय दत्तच्या नावाचा खुलासा झाला होता..
बॉम्बस्फोट प्रकरणात संजय दत्तवर आरोप झाल्यामुळे बॉलीवूडमध्ये भूकंप आला होता....त्यावेळी संजय दत्त मॉरिशसमध्ये अतिष नावाच्या सिनेमाच्या शुटिंगसाठी गेला होता....ते शुटिंग मध्येच थांबवून संजय दत्तला चौकशीसाठी मुंबईला पाचारण करण्यात आलं...संजय दत्त मुंबई विमातळावर उतरताच त्याला अटक करण्यात आली...पोलिसांनी त्याच्याकडं कसून चौकशी केल्यानंतर त्याने गँगस्टर अबू सालेम , समीर हिंगोरा आणि हनिफ कडावाला हे तिघेजण आपल्या घरी आल्याची कबुली संजय दत्तने दिल्याचा दावा पोलिसांनी केला होता....कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमने मुंबई बॉम्बस्फोटाचा कट आखल्याचं तोपर्यंत उघड झालं होतं आणि संजय दत्तच्या घरी आलेले समीर हिंगोरा आणि हनिफ कडावाला तिघेजण दाऊदचे विश्वासू साथिदार होते...त्यामुळे संजय दत्तवर संशय वाढला...१६ जानेवारी १९९३ला समीर हिंगोरा , हनिफ कडावाला आणि बाबा चौहान या तिघ्यांनी तीन एके ५६ रायफल, ९ एमएम पिस्तूल , काडतूस तसेच काही हँडग्रेनेड संजयकडं दिली होती...मात्र पुढे एक एके५६ रायफल आणि ९ एमएम पिस्तूल स्वत: जवळ ठेवून बाकीची शस्त्र आरोपींना परत केल्याची कबुली संजय दत्तने दिल्याचा दावा सीबीआयने केला होता.... ही शस्त्र १९९३च्या बॉ़म्बस्फोटासाठी कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमने मुंबईत पाठवली होती...त्यामुळे मुंबई बॉम्बस्फोटाच्या कटात संजय दत्त सहभागी असल्याचा आऱोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता...
मुंबई दंगली नंतर स्वसंरक्षणासाठी आपण ती रायफल घेतल्याचा दावा संजय दत्तने केला होता.. मुंबईत बॉम्बस्फोट झाले त्यावेळी आपण परदेशात होतो आणि त्याचवेळी त्याने आपला मित्र युसुफ नळवाला याला घरातील रायफल नष्ट करण्यास सांगितलं होतं..पण पुढे खटल्या दरम्यान संजय दत्तने कबुली जबाब फिरवला..
१९ एप्रिल १९९३ला संजय दत्तला अटक झाल्यानंतर ५ मे १९९३ला त्याला अंतरिम जामीन मंजुर करण्यात आला..पण त्यानंतर जुलै १९९४ला त्याला पुन्हा अटक करण्यात आली... आणि पुढे ऑक्टोबर १९९५ पर्यंत तो तुरुंगातच होता....पण तो पर्यंत बॉलीवूडचा संजू बाबा जनतेच्या दृष्टीने खलनायक बनला होता...
१९९३ ते २०१३ या दोन दशकात अभिनेता संजय दत्तच्या फिल्मी करिअरमध्ये अनेक चढ उतार आले..कधी तुरुंगात तर कधी तुरुंगाबाहेर असा त्याचा प्रवास झाला...१९९३मध्ये पहिल्यांदा अटक झाल्यानंतर त्याचं फिल्मी करिअर संपलं असंच सर्वांना वाटलं होतं..पण प्रेक्षकांनी मात्र वेगळाच कौल दिला...
1993मध्ये जेव्हा खलनायक सिनेमाचं चित्रिकरण सुरु होतं तेव्हा तेव्हा संजय दत्तला एक दिवस तुरुंगात जावं लागेल याचा कुणी स्वप्नातही विचार केला नव्हता..१२ मार्च १९९३ला मुंबईत साखळ बॉम्बस्फोटानंतर झालेल्या तपासात संजय दत्तलाही अटक झाली होती..तेव्हा संजय दत्तच्या फिल्मी करियरचा दी एन्ड झाल्याचं अनेकांनी भाकित केलं होतं..कारण बॉम्बस्फोटामुळे जनतेच्या मनात प्रचंड असंतोष खदखदत होता..आणि त्या प्रकरणात संजय दत्तचं नाव पुढं आलं होतं...पण पुढं वेगळंच घडलं संजय दत्त तुरुंगात गेल्यानंतर लोकांचा राग हळूहळू कमी होत गेला..संजय दत्तचा खलनायक प्रदर्शीत झाल्यानतर तो सुपर हिट झाला..तसेच संजय दत्तच्या अभिनयाचं कौतुकही झालं..
मधल्या काळात संजय दत्तने काही चित्रपट केले..पण १९९९मध्ये दिग्दर्शक संजय मांजरेकर यांच्या वास्तव सिनेमातून तो पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकला..वास्त सुपर हिट झाला आणि संजय दत्तच्या फिल्मी करिअरला वेगळ वळण मिळालं...त्यानंतर चार वर्षांनी मुन्नाभाई एमबीबीएस प्रदर्शीत झाला आणि संजू बाबाने सिनेरसिकांची मने जिंकली...मुन्नाभाईच्या सिक्वलने तर कमालच केली..पण २००७मध्ये टाडा कोर्टाने संजय दत्तला सहा वर्षाची शिक्षा ठोठावली आणि तो पुन्हा गजाआड गेला...जसं इंटरव्हलनंतर कथाच बदलून जावी...
पण जेलमधून बाहेर आल्यानंतर संजय दत्तने पुन्हा एकदा आपल्या फिल्मी करिअरवर लक्ष्य केंद्रीत केलं..शूटआऊट एट लोखांडवाला,धमाल, अग्निपथ, सन ऑफ सरदार या सारखे चित्रपट केले..आणि प्रेक्षकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला..पण त्याच्या फिल्मी करिअरचा खरा क्लायमॅक्स गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आला..जेव्हा न्यायालयाने त्याची पाच वर्षाची शिक्षा कायम ठेवली..
अभिनेता संजय दत्तला 5 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आलीय.. त्यामुळे आता बॉलिवूड निर्मात्यांचे धाबे दणाणलेत.कारण 2013 ते 2015 यावर्षापर्यंत संजूबाबाच्या नावावर जवळपास 10 फिल्म्स आहेत....
1993 च्या मुंबईच्या साखळी बॉम्ब स्फोटाच्या निकालात मुन्नाभाई संजय दत्तचं काय होणार याकडं संजूबाबाच्या फॅन्सप्रमाणेच बॉलिवूडच्याही नजरा लागल्या होत्या... कोर्टानं दिलेल्या निर्णयानुसार संजय़ दत्तला पाच वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. त्यापैकी संजूबाबानं 18 महिन्यांची शिक्षा आधीच भोगलीय. त्यामुळे आता उर्ववरीत साडे तीन वर्षांची शिक्षा संजयला भोगावीच लागणारेय. या निर्णयामुळे बॉलिवूडचे निर्माते चांगलेच हादरलेत. सध्या संजूबाबाच्या नावावर जवळपास 10 फिल्म्स आहेत. त्यापैकी राज कुमार हिरानीची `पी.के.` ही फिल्म जवळपास 50 टक्के पूर्ण झालीय.. `पोलिसगिरी` ही फिल्म जवळपास 80 टक्के पूर्ण झालीय.. तर करण जोहर होम प्रॉडक्शनची उंगली, ही फिल्म फक्त 30 टक्केच पूर्ण झालीय.. तसंच जंजीरचंही शुटिंग सुरु झाल्याची चर्चा होती. हे चार सिनेमे मिळून जवळपास 70 ते 80 कोटी रुपयांचं नुकसान बॉलिवूड निर्मात्यांना सहन करावं लागणारेय. इतकंच नाही तर त्याच्या नावावर असणा-या एकूण 10 सिनेमांचं मिळून जवळपास 250 कोटी रुपये संजय दत्तवर लागलेत. संजय दत्तला ठोठावण्यात आलेल्या शिक्षेमुळे
पीके 2013
जंजीर 2013
अलिबाग - 2013
पोलिस गिरी - 2013
मिस्टर फ्रॉड - 2013
जान की बाझी - 2013
पॉवर- 2013
जब जब फूल्स मिले - 2013
मुन्नाभाई - 2014
चमको चमेली- 2015
या सिनेमांचं भवितव्य धोक्यात आहे.
नुकतीच संजय दत्तनं आपली सिनेनिर्मिती संस्थाही स्थापन केली होती. या शिक्षेमुळे त्या निर्मिती संस्थेचं पुढे काय हाही प्रश्नच आहे. नुकताच रिलज झालेल्या जिला गाझियाबाद या सिनेमात संजय दत्तचं दर्शन घडलं होतं. आता पुन्हा संजूबाबा बिग स्क्रीनवर कधी दिसेल असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना प़डलाय मात्र त्याचं उत्तर संजूबाबा कडेही नाहीए...एकुणच संजय दत्तने केल्याला कृत्याचं प्रायश्चित्य तो भोगतोच आहे...मात्र त्याच्यामुळे बॉलिवूडला ख-या अर्थाने शिक्षा झालीय...नाही का...
First Published: Thursday, March 21, 2013, 23:55