संजय दत्त `येरवड्यासाठी टाडा`मध्ये, Sanajy Dutt in tada court

संजय दत्त `येरवड्यासाठी टाडा`मध्ये

संजय दत्त `येरवड्यासाठी टाडा`मध्ये
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

संजय दत्तच्या चाहत्यांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे... सुप्रीम कोर्टानं शरण येण्यासाठी दिलेली ४ आठवड्यांची मुदत उद्या संपते आहे.

संजयनं थेट येरवडा जेलमध्ये शरणागती पत्करण्यासाठी विशेष टाडा न्यायालयात परवनागी मागितली आहे. आज ११ वाजता त्यावर सुनावणी होणार आहे. कोर्टानं परवानगी दिली, तर त्याला मीडियाचा पाठलाग टाळून थेट पुण्यात जाता येईल.

संजय दत्तनं येरवडा जेलमध्ये शरण येण्याची परवानगी मिळावी यासाठी टाडा कोर्टात याचिका दाखल केलीय. संजय दत्तची मागणी मान्य करणे शक्य आहे का, याबाबत टाडा कोर्टाने सीबीआयला निर्देश दिले आहेत. तसंच उद्यापर्यंतच म्हणणं मांडण्याचे आदेशही कोर्टानं दिले आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, May 15, 2013, 10:05


comments powered by Disqus