Last Updated: Thursday, March 21, 2013, 17:27
www.24taas.com, मुंबई१९९३ च्या बॉम्बस्फोटाप्रकरणी अभिनेता संजय दत्त याला पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यामुळे संजय दत्त याला सगळ्यात मोठा झटका बसला आहे. याआधी संजय दत्त याने १८ महिन्यांचा तरूंगावास भोगला होता. बेकायदा शस्त्रे बाळगल्या प्रकरणी ही शिक्षा ठोठावण्यात आली आहे. त्यामुळे संजय दत्तला आणि साडेतीन वर्षाची शिक्षा भोगावी लागणार आहे. पुहा संजय दत्तला शिक्षा सुनावल्यावर संपूर्ण बॉलिवूडला दुःख झालं आहे.
बॉलिवूडने संजय दत्तला दिलेल्या शिक्षेबद्दल हळहळ व्यक्त केली आहे. संजय दत्तला गुन्ह्याच्या मानाने खूप मोठी शिक्षा दिली गेली असल्याचं बॉलिवूड कलाकारांचं म्हणणं आहे... तुम्हाला काय वाटतं? संजय दत्तला ठोठावण्यात आलेली शिक्षा योग्य आहे का?
First Published: Thursday, March 21, 2013, 17:20