Last Updated: Saturday, June 1, 2013, 12:31
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई छोट्या पडद्यावरील अभिनेता अबीर गोस्वामी यांचे वयाच्या ३८ व्या वर्षी निधन झालं. हृदय विकाराचा तीव्र धक्काने त्यांचे निधन झाले. छोट्या पडद्यावरील अनेक डेली सोपमधून काम करणारे अबीर गोस्वामी यांनी आपला चांगलाचा ठसा उमटवला होता. त्यांच्या निधनामुळे इंड्रस्ट्रीमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येते आहे.
‘कुसुम’ आणि ‘प्यार का दर्द है’ या मालिकांमध्ये काम करणाऱ्या अबीर गोस्वामी यांनी आपल्या सक्षम अभिनयाने साऱ्यानाच थक्क केले होते. या मालिकांतील अभिनय, हा त्यांना वेगळ्या उंचीवर घेऊन गेला.
अबीर यांची प्रकृती उत्तम होती. काल ते जीमलाही गेले होते. मात्र ट्रेडमिलवर धावता धावताच त्यांना हृदय विकाराचा तीव्र धक्का आल्याने, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, June 1, 2013, 12:21