बीग बॉस : तनिषासाठी अजय-काजोलचा सलमानला फोन?, ajay devgan-kajol calls salman for aviction of tanisha

बीग बॉस : तनिषासाठी अजय-काजोलचा सलमानला फोन?

बीग बॉस : तनिषासाठी अजय-काजोलचा सलमानला फोन?

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

‘बीग बॉस सीझन ७’मध्ये सहभागी होण्याच्या निर्णयापासून तनिषा मुखर्जीचे कुटुंबीय नाराज होते. त्यानंतर आता तर घरात तनिषा आणि अरमानच्या वाढत्या जवळकीच्या बातम्यांनी तर तनिषाच्या कुटुंबीयांच्या सहनशीलताच संपलीय.

तनिषाची आई अभिनेत्री तनुजा तसंच तनिषाची बहिण काजोल आणि मेहुणा अजय देवगण तनिषाच्या काळजीनं चिंताग्रस्त आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, तनिषाला या कार्यक्रमातून आणि बीग बॉसच्या घरातून बाहेर काढण्यासाठी नाराज असलेल्या अजय देवगण आणि काजोलनं सलमान खानला फोन केला आणि तनिषाला बाहेर काढण्यासाठी काहीतरी करावं, अशी विनंतीदेखील केली.

बीग बॉसमध्ये नुकतंच तनिषा आणि अरमान आपत्तीजनक अशा अवस्थेत आढळले होते. घरातील अनेक कॅमेऱ्यांनी हे दृश्यं टिपलं असलं तरी हे फुटेज टीव्हीवर मात्र दाखवलं गेलं नाही. परंतु बीग बॉसच्या टीमनं आणि स्टाफनं मात्र हे दृश्यं लाईव्ह पाहिलं होतं. या बातमीनंतर तनिषाच्या घरी एकच वादळ उठलं.

तनिषाला याअगोदर सलमाननंही अरमानसोबत तिच्या वागण्याबद्दल सरळ सरळ इशारा दिला होता. परंतु, या कार्यक्रमातून एखाद्या स्पर्धकाला बाहेर काढण्याचा निर्णय कार्यक्रमाचा होस्ट घेऊ शकत नाही, असं सांगून सलमाननं स्वत:ला या वादापासून वेगळं ठेवलंय.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, November 25, 2013, 17:31


comments powered by Disqus