मोदींसाठी काहीपण! राहुलमध्ये इंस्ट्रेस्ट नाही - मल्लिकाAnything for Narendra Modi, Mallika Sherawat

मोदींसाठी काहीपण! राहुलमध्ये इंट्रेस्ट नाही - मल्लिका शेरावत

मोदींसाठी काहीपण! राहुलमध्ये इंट्रेस्ट नाही - मल्लिका शेरावत
www.24taas.com, पीटीआय, मुंबई

नरेंद्र मोदीच “देशातील सर्वात योग्य अविवाहित पुरुष” असं वक्तव्य करणाऱ्या मल्लिका शेरावतनं पुन्हा एकदा मोदींची स्तुती केलीय. एवढंच नव्हे तर तिनं आपल्याला “राहुल गांधींपेक्षा नरेंद्र मोदीच आवडतात” हे स्पष्ट केलंय.

बॉलिवूडची ही हॉट स्टार अभिनेत्री सध्या `द बॅचलोराईट इंडिया- मेरे खयालो की मल्लिका` या टेलिव्हीजन कार्यक्रमातून प्रेक्षकांसमोर आलीय. या रिअॅलिटी शोमध्ये ती तिच्यासाठी एक उत्तम पती निवडणार आहे.

खऱ्या प्रेमाच्या शोधात असलेल्या मल्लिकानं आपल्याला राजकीय व्यक्तींमध्ये रस असल्यासारखं वक्तव्य केलंय. मल्लिका म्हणते, "मी कोणत्याही आशा न बाळगणारी रोमॅन्टिक मुलगी आहे. मला ते (नरेंद्र मोदी) आवडतात. राहुल गांधींमध्ये मला स्वारस्य नाही".

मल्लिकानं याआधीही नरेंद्र मोदींची स्तुती केली होती. शिवाय वाढदिवशी मल्लिकानं शुभेच्छा देणारा `व्हिडिओ मॅसेज` मोदींना पाठविला होता. आपल्या लग्नाबाबत मल्लिका म्हणते, "मला मनोरंजन क्षेत्राशी निगडीत व्यक्तीशी विवाह करण्यात रस नाही. मला वैवाहित जीवनात सर्वसामान्यपणा हवा आहे. त्यामुळं आतापर्यंत अनेक अभिनेत्रींचे डॉक्टर, व्यावसायिकांशी विवाह झालेले आहेत."

त्यामुळं आता मल्लिकाचा जोडीदार नक्की कोण होईल, याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Sunday, October 6, 2013, 17:01


comments powered by Disqus