Last Updated: Saturday, November 3, 2012, 14:13
www.24taas.com, मुंबई व्यंगचित्रकार आणि रिअलिटी शो ‘बिग बॉस’च्या घरातील पाहुणा असीम त्रिवेदी याची या कार्यक्रमातील प्रवास संपला आहे.
कार्यक्रमातून बाहेर आल्यावर असिमने सांगितले की, या कार्यक्रमातील आपले काम पूर्ण झाले आहे. मला स्वतःलाच या घरातून बाहेर यायचे होते.
भ्रष्टाचाराविरोधातील लढाई या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला लोकांसमोर पोहचवायची होती. गेल्या चार आठवड्यापासून मी या कार्यक्रमात आहे. त्यामुळे माझे हे काम पूर्ण झाले आहे.
दरम्यान, असिम त्रिवेदीला बिग बॉसच्या घरातून बाहेर काढा या मागणीसाठी आयपीआय कार्यकर्त्यांनी कलर्स चॅनलच्या कार्यालयावर दगडफेक केली होती. त्यामुळे असिम त्रिवेदीला बाहेर जावे लागले असे मतप्रवाह समोर येत आहे.
First Published: Saturday, November 3, 2012, 14:07