अंजना पद्मनाभन पहिली इंडियन आयडल ज्युनिअर!, Bangalore girl Anjana Padmanabhan wins first `Indian Idol Junior`

अंजना पद्मनाभन पहिली इंडियन आयडल ज्युनिअर!

अंजना पद्मनाभन पहिली इंडियन आयडल ज्युनिअर!
www.24taas.com , झी मीडिया, मुंबई

बंगळुरूची अंजना पद्मनाभन इंडियन आयडल ज्यूनिअर या रिअॅलिटी शोची विजेती ठरलीय. यंदाचा इंडियन आयडल ज्यूनिअरचा हा पहिलाच सिझन होता. बिग बी अमिताभ बच्चन यांनी विजेत्याची घोषणा केली.

फायनलमध्ये चार जणांमध्ये चुरस रंगली होती. देशभरातल्या एकूण ८६ स्पर्धकांनी या शोमध्ये सहभाग घेतला होता. त्यातले टॉप ११ निवडण्यात आले.

फायनलमध्ये दाखल झालेल्या अंजना पद्मनाभन, अनमोल जयवाल, निर्वेश दवे आणि देबांजना मित्रा यांनी ग्रँड फिनालेमध्ये चांगलीच रंगत आणली. फिनालेला आपला आगामी चित्रपट ‘फटा पोस्टर, निकला हिरोच्या’ प्रमोशनसाठी अभिनेता शाहीद कपूरनं हजेरी लावली. तर ‘जंजीर’च्या प्रमोशनसाठी प्रियंका चोप्रा आणि रामचरणनंही कार्यक्रमात रंगत आणली.
पण सगळ्यांच्या नजरा होत्या त्या बिग बी अमिताभ बच्चन यांच्याकडे. ‘कौन बनेगा करोडपती’च्या सिझन ७ची येत्या ६ सप्टेंबरपासून सुरुवात होतेय. त्या अनुषंगानंच बिग बीनं इंडियन आयडल ज्यूनिअरच्या फिनालेला हजेरी लावली.

पहिली इंडियन आयडल ज्यूनिअर बनलेल्या अंजनाला २५ लाख रुपये, एक कार, पाच लाखांची एफडी आणि प्रायोजकांकडून दोन लाख रुपये मिळाले.

देबांजना मित्रा पहिली उपविजेता ठरली. तर अनमोल आणि निर्वेश हे दुसरे उपविजेते ठरले.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, September 2, 2013, 09:18


comments powered by Disqus