Last Updated: Saturday, December 28, 2013, 23:18
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईबिग बॉस-७ ची विजेती ठरलीय अभिनेत्री गौहर खान... आज लोणावळा इथं झालेल्या ग्रँड फिनालेमध्ये गौहर खानचं विजेती म्हणून नाव घोषित करण्यात आलंय. गौहर खान, तनिषा मुखर्जी आणि संग्राम सिंग हे फायनलमधील स्पर्धक होते. तनिषा आणि संग्रामला मागे टाकत अखेर गौहरनं हे विजेतेपद पटकावलं.
नेहमीप्रमाणे बिग बॉसचा यंदाचा सिझनही वादग्रस्त ठरला. शिवीगाळ, मारापिटी सोबतच गौहर-कुशाल आणि अरमान-तनिषाची लव्हस्टोरीही इथं रंगली.
तनिषा मुखर्जी पहिली उपविजेती ठरलीय. तर एजाज खान आणि संग्राम प्रत्येकी दुसरे आणि तिसरे उपविजेते ठरले आहेत.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, December 28, 2013, 23:18