Last Updated: Sunday, January 13, 2013, 07:56
www.24taas.com, मुंबई‘बिग बॉस सिझन ६’ ची अखेर सांगता झाली. उर्वशी ढोलकीया या सिझनची विजेती ठरली. उर्वशीला ५० लाख रुपयांचं पारितोषिक मिळालं आहे. या सिझनचा उपविजेता ठरला इमाम सिद्दकी. उर्वशी ढोलकीया जिंकण्याची शक्यता सुरूवातीपासूनच होती. तिला टक्कर देणाऱ्या निकेतन मधोक हा तिचा तुल्यबळ प्रसिस्पर्धी चौथा रनर-अप ठरला. सना खान तिसरी रनर अप ठरली.
शनिवारी रात्री रंगलेल्या ‘बिग बॉस सिझन ६’ चा ग्रँड फिनाले शानदार ठरला. बिग बॉसच्या मंचावर अनेक सेलेब्स शानदार परफॉर्मन्स सादर केले. फिनालेच्या एक दिवस आधी या शोमधून राजीव पॉलला बिग बॉसने बाहेर रस्ता दाखवला. याच आठवड्यात डेलनाज ईराणीलाही शोबाहेर काढण्यात आले होते.
उर्वशी ढोलकीयाच्या विजयामुळे ‘बिग बॉस’मध्ये महिला विजेत्यांची हॅटट्रिक झाली आहे. यापूर्वी श्वेता तिवारी आणि जुही परमार या ही बिग बॉसच्या विजेत्या ठरल्या आहेत. तिन्ही अभिनेत्री या डेली सोप्समुळे घराघरांत पोहोचल्या होत्या. उर्वशीने ‘कसौटी जिंदगी की’ या डेली सोप मध्ये साकारलेली ‘कोमोलिका’ ही खलनायिका अजूनही लोकांच्या लक्षात आहे. उर्वशीने बिग बॉसमध्ये पहिल्यापासूनच आक्रमक बाणा वापरल्यामुळे ती प्रभावी ठरली.
First Published: Saturday, January 12, 2013, 18:53