बिग बॉसच्या स्पर्धकांवरून पडदा हटला! Bigg Boss-6 participants

बिग बॉसच्या स्पर्धकांवरून पडदा हटला!

बिग बॉसच्या स्पर्धकांवरून पडदा हटला!
www.24taas.com, मुंबई

अखेर बिग बॉस 6 च्या प्रतिस्पर्ध्यांवरून पडदा हटला आहे. बिग बॉसचं घर म्हणजे विचित्र स्वभावाचे वेगवेगळे सेलिब्रिटी यात सहभागी होऊन जो हैदोस घालतात, त्याचं बिनबोभाट प्रदर्शन. पण, त्यातून मानवी स्वभावांचं दर्शनही घडतं. यात विशेषतः फारसे नाव नसलेलेच सेलिब्रिटी सहभागी होतात. त्यांना एकाच घरात महिनों महिने बंद करून त्यांच्यावर विविध कॅमेरांमधून लक्ष ठेवलं जातं.

बिग बॉसच्या सीझन्समध्ये आत्तापर्यंत आलेले बहुतेक स्पर्धक वादग्रस्त ठरले आहेत. कित्येक गुन्हेगार, आरोपी तसंच बदनाम लोकांचाच या कार्यक्रमामध्ये भरणा होत असतो. यावेळी सामान्य माणासांनाही ‘बिग बॉस’मध्ये प्रवेश मिळणार आहे. तसंच जनावरंही त्यांच्यासोबत असतील. मात्र यावेळीही जे काही सेलिब्रिटी आहेत ते ही वादग्रस्तच आहेत. पण याचबरोबर काही इंटरेस्टिंग सेलिब्सही या वेळी पाहायला मिळेल.

यावेळी बिग बॉस-6 मध्ये मॉडेल-अभिनेत्री सायली भगत, मॅच-फिक्सिंगमुळे नावारूपाला आलेली नुपूर मेहता, सेक्स स्कँडलमध्ये अडकलेले स्वामी नित्यानंद, आमिर खानचा भाऊ फैजल खान, क्रिकेटर आणि समालोचक नवज्योतसिंग सिद्धू आणि अभिनेता- निवेदक जय भानुशाली यांचा सहभाग असल्याचं सांगण्यात येत आहे. दरवेळेस बिग बॉसला एक विदेशी तडका असतो. तसंच यावेळी विदेशातल्या टीव्हीवर आपल्या अदांनी आणि अर्धन्गन फोटोंनी खळबळ माजवलेल्या किम कर्देशियाँला पाचारण करण्यात येणार आहे, असं सांगण्यात येतंय.

First Published: Saturday, September 29, 2012, 14:31


comments powered by Disqus