सलमान म्हणजे काही देव नाही – सपना भावनानी, ‘Bigg Boss 6’: Salman is not God, says Sapna Bhavnani post eviction

सलमान म्हणजे काही देव नाही – सपना भावनानी

सलमान म्हणजे काही देव नाही – सपना भावनानी
www.24taas.com, मुंबई
बिग बॉस सीझन सिक्समधून सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्ट सपना भावनानी नुकतीच बाहेर पडलीय. आपल्या पद्धतीनेच चालण्याचा प्रयत्न करणाऱ्या सपनाला मात्र उरलेल्या स्पर्धकांपैकी कुणीही या कार्यक्रमाचं विनर नकोय, तिच्या मते याआधीच बाहेर पडलेले कार्टुनिस्ट असिम त्रिवेदी आणि गुलाबी गँग लिडर संपत पाल हे दोघांनी हा रिअॅलिटी शो जिंकायला हवा होता. बरोबरच सपनानं सलमानलाही डिवचलंय.

असिम आणि संपत यांचा या शोमध्ये असताना सपनाशी चांगले संबंध राहिले होते. ‘माझ्या मते अलग छे खरोखरच वेगळी कल्पना होती आणि या शोमध्ये माझ्या रोल मॉडेल असलेल्यांपैकी कुणीतरी जिंकायला हवं होतं. मला असिमला आणि संपतला जिंकताना पाहायला आवडलं असतं’ असं बाहेर पडल्यानंतर सपनानं म्हटलंय.

बाहेर पडलेल्या सपनानं कार्यक्रमाचा होस्ट सलमान खानलाही सोडलेलं नाही. ‘सलमान म्हणजे काही देव नाही आणि मीही नाही. आम्ही दोन वेगवेगळ्या व्यक्ती आहोत. तो नंबर वनचा स्टार आहे म्हणून त्याच्याशी वागताना मला एका पद्धतीप्रमाणेच वागावं लागणार हे मला मान्य नाही’ असंही सपनानं म्हटलं. कार्यक्रमादरम्यान, सलमान आणि सपनाचा चांगलाच वाद झाला होता.

सध्या बिग बॉस ६ मध्ये खऱ्या जीवनात विभक्त झालेली जोडी डेल्नाझ इराणी, राजीव पॉल, सना खान, इमाम सिद्दीकी, निकेतन मधोक आणि उर्वशी ढोलकिया हे स्पर्धक उरलेत. १२ जानेवारी रोजी या कार्यक्रमाचा शेवट होणार आहे. सपनाच्या मते, राजीव, डेल्नाझ आणि सना हा कार्यक्रम जिंकण्यासाठी योग्य व्यक्ती नाहीत. त्यामुळे ती इमाम, निकेतन आणि उर्वशी यांनाच विजेते मानतेय.

First Published: Saturday, January 5, 2013, 11:51


comments powered by Disqus