बिग बॉस ७- अरमानच्या खोलीसमोर तनिषा Naked ...काय आहे सत्य!,Bigg Boss 7: Armaan and Tanisha Caught Nu

बिग बॉस ७- अरमानच्या खोलीसमोर तनिषा Naked ...काय आहे सत्य!

बिग बॉस ७- अरमानच्या खोलीसमोर तनिषा Naked ...काय आहे सत्य!

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

कलर्स वाहिनीवरील जोरदार चर्चेत असलेला रिअॅलिटी शो ‘बिग बॉस-७’ मध्ये रोज काहीन काही घडतच असतं. काही दिवसांपूर्वी अशी बातमी पसरली की ‘बिग बॉस-७’मधील स्पर्धक अरमान कोहली आणि तनिषा मुखर्जी कॅमेऱ्यासमोर पूर्णपणे नग्न आणि आपत्तीजनक अवस्थेत पाहण्यात आले. परंतु आता असे सांगितले जाते की, निर्मात्यांनी या बातमीला साफ नकार दिला आहे. निर्मात्यांनुसार असं काही घडलच नव्हत.

शोमधील अरमान- तनिषातील जवळीक पाहुन कोणाला ही असंच वाटेल, की दोघांमध्ये प्रेमसंबंध आहेत. तनिषाच अरमानला प्रत्येक गोष्टित साथ देणं, तिच्या मनातील अरमानविषयीचा सॉफ्ट कॉर्नर, प्रत्यक्षात मात्र त्यांनी याची कबुली दिली नाही. परंतु दोघांचे हावभाव, बॉडी लँगवेज यावरुन हे स्पष्ट होतं की दोघेही एकमेकांवर प्रेम करतात. परंतु कॅमेरासमोर आपलं प्रेम व्यक्त करायला ते टाळतात.

शोचा होस्ट सलमान खानने ही एकदा बिग बॉसच्या एका भागामध्ये तनिषाला सतर्कतेचा इशारा दिला होता की, ‘बिग बॉसच्या घरात तुम्ही जे काही करता, त्यावर ८४ कॅमेरांचे लक्ष असते, जो तुमच्या प्रत्येक हरकतींना आणि प्रत्येक क्षणांना कॅप्चर करत असतो.’

तनिषा ही बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध घरातील सदस्य आहे. सुपरस्टार काजोल ही तिची बहीण आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, November 21, 2013, 16:45


comments powered by Disqus